समलिंगी विवाहासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन केले
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एस रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर 18 एप्रिल रोजी विविध याचिकांवर सुनावणी होणार आहे.